विद्यार्थी मित्रांनो जीवनात सकारात्मकता अंगी बाळगायला हवीत -बाबासाहेब गोंटे

अंबड;विद्यार्थी मित्रांनो जिवन जगताना नेहमीच सकारात्मकता अंगी बाळगायला हवा. यासाठी मनातील नकारात्मक काढून टाकायला हवीत.तेंव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला यशाचा मार्ग शोधता येईल. असे आवाहन प्रसिध्द व्याख्याते बाबासाहेब गोंटे यांनी अंबड तालुक्यातील कर्जत येथील राजुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरूवारी (ता.6) दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.राहूल डोंगरे तर प्रमूख छत्रपती संभाजी नगर येथील कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ.धनंजय घुगे, प्रमूख व्याख्याते म्हणुन प्रसिद्ध वक्ते बाबासाहेब गोंटे प्रल्हाद उगले यांची प्रमूख उपस्थिती होती.पुढे बोलताना वक्ते बाबासाहेब गोंटे म्हणाले की, विद्यार्थ्यानी आपले उच्च ध्येय गाठण्यासाठी सतत आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करणे गरजेचे आहे.यासाठी मनात जिद्द, चिकाटी व परिश्रम करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.अभ्यासात सातत्य ठेवल्यास निश्चित यशाचे शिखर गाठता येईल. मात्र यासाठी प्रयत्नवादी व आशावादी राहायला हवे.असे आवाहन हि शेवटी बाबासाहेब गोंटे यांनी बोलताना केले. याप्रसंगी कार्यक्रमाला प्राचार्य विलास टकले, माजी चेअरमन विजयकुमार डोंगरे, सरपंच संजय काळूंके, चेअरमन ज्ञानेश्र्वर डोंगरे, माजी सरपंच श्रीहरी डोंगरे, ब्रह्मदेव मुंढे, प्रा.भरत शेरे, प्रा.ओमप्रकाश घुगे, भारत झरेकर,वीर, अशोक उगलेसह शाळेतील इयत्ता नववी, दहावी,अकरावी, बारावीचे विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विलास टकले यांनी तर सूत्रसंचलन प्रा. सुभाष जीगे यांनी व शेवटी आभार वीर यांनी मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!