सूर्योदय वृत्तसेवा
जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अंबड तालुक्यातील लखमापुरी येथे भेट दिली.यावेळी त्यांनी गाडे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
पाहणी दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला.अतिवृष्टीमुळे पिके पूर्णपणे खराब झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या दौऱ्यात पंकजा मुंडे यांनी शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. स्थानिक नेते आणि कार्यकर्तेही या वेळी उपस्थित होते.