सूर्योदय वृत्तसेवा
अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील शालेय समितीच्या निवड प्रक्रियेत एकमताने निवड पार पडली.अध्यक्षपदी कल्याण शिंदे यांची,तर उपाध्यक्षपदी भारत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीत सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेतल्याने गावात समाधानाचे वातावरण आहे. निवडीनंतर नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा ग्रामस्थ व शिक्षकवर्ग यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.नवीन पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विशेष भर देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.या वेळी ग्रामपंचायत सदस्य,पालक प्रतिनिधी,शिक्षकवर्ग,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.