नैसर्गीक अनुदान घोटाळ्यातील तलाठी किरण जाधव आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

.सूर्योदय वृत्तसेवा|जालना

जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.त्यामध्ये शासनाने वेळोवेळी 04 जी आर काढुन बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. त्यामध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यात यादया अपलोडींगचे काम काज करणारे अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस (शेती नावावर नसलेले) नावे याद्या मध्ये अपलोड करुन त्यांचे नावे आलेल्या शासनाचे अनुदानाची रक्कम त्यांचे कडुन परस्पर परत घेतल्या संबंधी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणात सत्यता पडताळणी साठी चौकशी समीती गठीत केली होती.

चौकशी समीतीने चौकशी करुन एकुण 240 गावामध्ये 24,90,77,811/- इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाला असल्या बाबत अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा रजि. क्र. 453/2025 कलम 316(4), 316(5), 318(4), 324(5), 336(3), 338, 340(2), 339, 238, 3(5) BNS सह कलम 52, 53 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक साहेब जालना यांचे आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा जालना करीत आहे. सदर गुन्हयात यापुर्वी 08 आठ आरोपीतांना अटक करण्यात आलेले आहे.

सदर गुन्हयातील फरार आरोपींचा शोध घेणे कामी रवाना होऊन आरोपी किरण रविंद्र जाधव वय 36 वर्ष व्यवसाय तलाठी सजा पानेगाव तहसील अंबड रा. देऊळगाव राजा ता. जि. बुलढाणा ह.मु. अंबड ता. अंबड जि. जालना. हा छत्रपती संभाजीनगर येथे मिळुन आल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीसह एकुण नऊ आरोपीतांना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेले असुन फरार आरोपीतांचा शोध सुरू आहे.सदरची कामगीरी ही अजयकुमार बंन्सल पोलीस अधीक्षक जालना,आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना,सिध्दार्थ माने प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना,यांचे मार्गदर्शनाखाली मिथुन घुगे स.पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना,पोलीस अंमलदार गोकुळसींग कायटे,समाधान तेलंग्रे,किरण चव्हाण, अंबादास साबळे,गजानन भोसले,सागर बावीस्कर,दत्ता वाघुंडे,विष्णु कोरडे,ज्ञानेश्वर खुने,रविंद्र गायकवाड,शुभम तळेकर,श्रेयस वाघमारे,चालक पाठक मेजर,महिला अंमलदार जयश्री निकम,निमा घनघाव,मंदा नाटकर यांनी पार पाडली.

Leave a Comment

error: Content is protected !!