सूर्योदय वृत्तसेवा|जालना
जालना येथील होमगार्ड कार्यालयाकडून ७९ वा होमगार्ड वर्धापन दिन होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्हा होमगार्ड कार्यालय जालना तर्फे ७९ वा वर्धापन दिनानिमित्त दि.८ डिसेंबर पासून वर्धापन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच दि.१२ डिसेंबर रोजी जिल्हा होमगार्ड कार्यालय जालना येथे ध्वजारोहण व पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा व वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी किशोर राठोड, केंद्र नायक राजेंद्र शेळके,तालुका समादेशक शरद मोरे,पुंडलिक अंभोरे (पलटन नायक), के.एम शेख (पलटन नायक),ए.बी.पठाण,श्री.शेजुळ व समस्त होमगार्ड महिला व पुरुष सैनिकांची या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती