सूर्योदय वृत्तसेवा|जालना
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये शासनाने वेळोवेळी 04 जी आर काढुन बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. त्यामध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यात यादया अपलोडींगचे काम काज करणारे संबधत अधिकारी कर्मचारी यांनी मोठया प्रमाणावर बोगस (शेती नावावर नसलेले) नावे यादया मध्ये अपलोड करुन त्यांचे नावे आलेल्या शासनाचे अनुदानाची रक्कम त्यांचे कडुन परस्पर परत घेतल्या संबंधी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणात चौकशी समीती गठीत केली होती.
चौकशी समीतीने चौकशी करुन एकुण 240 गावामध्ये 24,90,77,811/- इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाला असल्या बाबत अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात 22 तलाठी, तहसिल कार्यालयातील नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन विभागातर्गत कामकाज करणारे 05 कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालय येथे नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात काम करणारा 1 असे एकुण 28 आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा रजि. क्र. 453/2025 कलम 316(4), 316(5), 318(4), 324(5), 336(3), 338, 340(2), 339, 238, 3(5), 61(2) BNS सह कलम 52, 53 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदर प्रकरणात गुन्हा नोंद झाले पासुन आरोपी फरार झाले होते ते पोलीसांचे नजरेआड राहत होते. आरोपी मोबाईल वापरत नव्हते त्यामुळे त्यांचे अटकेसाठी अडसर येत होते त्यानंतरही गोपणीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने आज रोजी पावेतो एकुण 13 आरोपीना अटक केली आहे.गुन्हा नोंद झाल्या नंतर आरोपीतानी प्रथम जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन साठी अर्ज सादर केले होते.सदरील सर्वच आरोपीचे अटकपुर्व जामीन अर्ज मा.जिल्हा व सत्र न्यायालय अंबड यांनी फेटाळुन लावले होते.तदनंतर आरोपीतानी पोलीसांचे नजरे आड राहत पुन्हा मा.उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य मुंबई खंड पिठ छ.संभाजीनगर येथे अटकपुर्व जामीन अर्ज सादर केले होते. त्यावर वेळोवेळी सुनावण्या घेत न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणने ऐकुण घेतले त्यामध्ये दिनांक 22/12/2025 व दिनांक 23/12/2025 असे दोन दिवस दोन्ही पक्षाचा युक्त्तीवाद झाला व मा.न्यायालयाने निकाल राखुन ठेवला होता प्रकरणात आज रोजी मा.उच्च न्यायालयाने निकाल जारी करत 18 आरोपीचे अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळले त्या आरोपीचे नावे
1) गणेश ऋषिद्र मिसाळ 2) विठठल प्रल्हादराव गाडेकर, 3) सुकन्या श्रीकृष्ण गवते, 4) रामेश्वर नाना जाधव, 5) विजय हनुमंत जोगदंड, 6) रमेश लक्ष्मण कांबळे, 7) सुरज गोरख बिक्कड, 8) बप्पासाहेब रखमाजी भुसारे, 9) कृष्णा दत्ता मुजगुले, 10) निवास बाबुसिंग जाधव, 11) विनोद जयजयराम ठाकरे, 12) सुनिल रामकृष्ण सोरमारे, 13) वैभव विश्वभर आडगावकर, 14) वियज निवृत्ती भांडवले, 15) कैलास शिवाजीराव घारे, 16) डिगंबर गंगाराम कुरेवाड, 17) दिनेश ज्ञानेश्वर बेराड, 18) मोहीत दत्तात्रय गोषीक.
सदर प्रकरणात उच्च न्यायालया मध्ये मुख्य सरकारी अभियोक्ता श्री अमरजीतसिंग गिरासे, सोबत सहाय्यक सरकारी अभियोक्ता अफताब खान व आर के इंगोले यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली.
सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक सिध्दार्थ माने यांचे मार्गदर्शनाखाली मिथुन घुगे स.पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना,पोलीस अंमलदार गोकुळसींग कायटे,समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले,सागर बावीस्कर,दत्ता वाघुंडे, विष्णु कोरडे,ज्ञानेश्वर खुने,रविंद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर,महिला अंमलदार,जया निकम,निमा घनघाव,मंदा नाटकर यांनी पार पाडली.