नैसर्गिक अनुदान घोटाळ्यातील ३ तलाठयासह फरार ५ आरोपीना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

 

जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये शासनाने वेळोवेळी 04 जी आर काढुन बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. त्यामध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यात यादया अपलोडींगचे काम काज करणारे संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी मोठया प्रमाणावर बोगस (शेती नावावर नसलेले) नावे यादया मध्ये अपलोड करुन त्यांचे नावे आलेल्या शासनाचे अनुदानाची रक्कम त्यांचे कडुन परस्पर परत घेतल्या संबंधी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी चौकशी समीती गठीत केली होती.

चौकशी समीतीने चौकशी करुन एकुण 240 गावामध्ये 24,90,77,811/- इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाला असल्या बाबत अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात 22 तलाठी, तहसिल कार्यालयातील नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन विभागातर्गत कामकाज करणारे ५ कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालय येथे नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात काम करणारा १ असे एकुण २८ आरोपी विरुध्द पो. स्टे. अंबड येथे गुन्हा रजि. क्र. 453/2025 कलम 316(4), 316(5), 318(4), 324(5), 336(3), 338, 340(2), 339, 238, 61(2), 3(5) BNS सह कलम 52, 53 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदर प्रकरणात गुन्हा नोंद झाले पासुन आरोपी फरार झाले होते ते पोलीसांचे नजरेआड राहत होते. आरोपी पोलीस शोध घेऊन नये या साठी मोबाईल वापरत नव्हते तसेच सोशल मिडीया पासुन सुध्दा लांब राहत होते. त्यामुळे त्यांचे अटकेसाठी अडसर येत होते तरी सुध्दा त्यांचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने यापुर्वी एकुण १५ आरोपीना अटक केली आहे.

गुन्हयातील आरोपी हे गुन्हा नोंद झाल्यापासुन पोलीसांचे नजरे आड राहत आरोपीतानी प्रथम मा.जिल्हा व सत्र न्यायालय अंबड येथे अटकपुर्व जामीन साठी अर्ज सादर केले होते. ते अर्ज फेटाळुन लावल्यानंतर आरोपी हे उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य मुंबई खंडपिठ छत्रपती संभाजीनगर येथे अटकपुर्व जामीन मिळावा या साठी अर्ज सादर केले होते सदर प्रकरणात तपास अधिकारी यांनी गुन्हयात सखोल तपास करुन पुराव्यानिशी कागदपत्रे मा.न्यायालयात वेळेत सादर केल्याने मा.न्यायालयाने वेळोवेळी सुनावणी घेऊन आरोपीचे सर्वच अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळलेले आहेत.

गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी १) सुनील रामकृष्ण सोरमारे वय 37 वर्षे व्यवसाय मंडळ अधिकारी बदनापूर रा. वालसा वडाळा तालुका भोकरदन जिल्हा जालना ह.मु. माऊली नगर अंबड रोड जालना २). बप्पासाहेब रखमाजी भुसारे वय 53 वर्ष व्यवसाय तलाठी मंगू जळगाव राहणार नूतन वसाहत अंबड तालुका अंबड जिल्हा जालना ३) रामेश्वर नाना जाधव वय 48 वर्षे व्यवसाय तलाठी राहणार लोणार भायगाव तालुका अंबड जिल्हा जालना.४) वैभव विश्वंभर आडगावकर वय 36 वर्षे व्यवसाय नेटवर्क इंजिनियर राहणार श्रीकृष्ण नगर अंबड तालुका अंबड जिल्हा जालना ५). विजय निवृत्ती भांडवले वय 34 वर्षे व्यवसाय ऑपरेटर राहणार कुंभारवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड ह.मु. राजुरेश्वरनगर अंबड तालुका अंबड जिल्हा जालना असे मिळुन आल्याने त्यांना अटक करण्यात आली असून आरोपी यांना मा. न्यायालयासम मध्ये हजर केले असता मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अंबड कोर्ट 2 रे यांनी आरोपीना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज रोजी पावेतो नमुद गुन्हयात २० आरोपीना अटक करण्यात आली असुन इतर फरार आरोपी व एंजटचा शोध सुरु आहे.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!