सूर्योदय वृत्तसेवा (गणेश जाधव)
सन २०२४-२५ करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ स्तरावरुन सुरु आहे.योजनेला मिळत असलेला प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन गरजू दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणीची सुविधा (अर्ज करण्यासाठी) https://register.mshfdc.co.in या पोर्टलवर १० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.