शिधापत्रिका धारकांना E-KYC साठी आवाहन

सूर्योदय वृत्तसेवा अंबड

अंबड तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचा लाभ कायम रहावा यासाठी ई-केवायसी ( e-KYC ) आणि मोबाईल सिडींग करुन घेणे आवश्यक आहे. तरी तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील गावामध्ये ई-केवायसीसाठी जनजागृतीपर शिबीरे घेण्यात येणार आहेत.तरी शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांनी शिबीरात येवून ई-केवायसी अवश्य करावी,असे आवाहन अंबड तहसील चे तहसीलदार विजय चव्हाण व निरीक्षण अधिकारी किरणकुमार खांडेभराड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.स्वस्त धान्य वितरण प्रणाली पारदर्शक व्हावी यासाठी शासनाने सुरु केलेल्या ई-केवायसीबाबत काही शिधापत्रिकाधारक उदासीन दिसत आहेत. 5 लाख 65 हजार 700 लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवासी केलेली नसल्याचे दिसुन आले आहे. तरी दि.२८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ई-केवायसी न केल्यास या लाभार्थ्यांना स्वस्त धान्यापासून कायमचे वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.लाभ मिळण्यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांच्या हाती आणखी काही दिवसाची अवधी आहे. आपल्या तालुक्यातील गावात ई-केवायसी सिडींग करुन घेण्यासाठी सर्व गावामध्ये शिबीर घेण्यात यावेत.अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत.शिधापत्रिका धारक व कुटूंबातील सदस्य स्वस्त धान्यापासुन वंचित राहू नये यासाठी ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे.तालुक्यातील ८७ हजार १६८ शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे.असेही कळविले आहे.तरी प्रलंबित शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचे आवाहन अंबड तहसील यांच्यामार्फत करण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!