सूर्योदय वृत्तसेवा
अंबड शहरातील पठाण मोहल्ला भागात राहणाऱ्या कलिम शेख खाजा शेख (वय ३०) या तरुणाचा अनैतिक संबंधाच्या संशयावरून शनिवारी (ता.१५) रात्री चाकूने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.पठाण मोहल्ला भागात शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत कलिम शेख याचे अनैतिक संबंध होते.याबाबत त्या महिलेच्या पतीला माहिती झाल्यामुळे पतीसह त्याचे भाऊ व अन्य नातेवाईक कलीम शेख याच्यावर पाळत ठेवून होते.रात्री 10.30 वाजेच्या सुमारास कलीम शेख यास पठाण मोहल्ल्यातील लाहोटी यांच्या घरासमोर गाठून सरफराज फेरोज शेख व अन्य तीन जणांनी त्याच्यावर धारदार चाकूने वार केले.त्यात गंभीर जखमी झालेल्या हा कलिम यास जालना येथे जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले होते, उपचार सुरू असताना तो मरण पावला,या घटनेची माहिती कळताच अंबड शहरात खळबळ उडाली होती.दरम्यान,कलिम शेख याच्या मृतदेह जालना येथील जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सरफराज शेख यांच्यासह चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिध्दार्थ बारवाल हे करीत असून, त्यांनी रात्रीच एका आरोपींला ताब्यात घेतल्याचे समजते.