जालना जिल्ह्यातील ग्रामसेवक,सरपंच तसेच हर घर नल योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार गुन्हे नोंदवणार का?

सूर्योदय वृत्तसेवा 

हर घर नल योजनेत ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाकडून शासनाची फसवणूक

शासनाने नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत त्या उपाययोजनांचा लाभ नागरिकांना मिळून देण्यासाठी करोडो रुपये जाहिरातीच्या माध्यमातून सरकार खर्च करत असते परंतु जालना जिल्ह्यातील बहुदा ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकांनी शासनाची पुरेपूर फसवणूक करून शासनाला खोटी माहिती देऊन पैसा लाटल्याचे पुरावे दैनिक सूर्योदयच्या हाती लागले आहेत…

 

 

सविस्तर माहिती अशी की केंद्र शासनाने २५ डिसेंबर २०१९ रोजी जल जीवन मिशन बाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना देण्याबाबत एक जीआर काढून जलजीवन मिशन याबाबत सूचना केल्या होत्या त्यानुसार गावातील खरोखर हर घर नल योजनेचे काम पूर्ण झाल्याचे माहिती त्यासाठी लागत असल्याने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालय व पाणीपुरवठा विभागाने काम अपूर्ण असतानाच काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र संबंधित विभागाला दिले आहे. त्यानंतर ते खोटे प्रमाणपत्र पाणीपुरवठा विभागाने खरे म्हणून अप्रोल सुद्धा केले आहे.जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी मिली भगत करून शासनाला खोटी माहिती देऊ शासनाची फसवणूक केले असल्याचे निदर्शनास आले आहे या सर्व बाबींचे पुरावे दैनिक सूर्योदय च्या हाती लागले असून शासनाला खोटी माहिती देणाऱ्या ग्रामसेवक,सरपंच तसेच पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचार व खोटी माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखलकरण्यात येणार आहे का व संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येणार आहे का हे बघावे लागणार आहे…..

गावात एकही नळ जोडणी नसताना सर्व कुटुंबांना नळ योजना दिल्याची खोटी माहिती 

अंबड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयाने गावात हर घर जल नुसार नळ कनेक्शन दिले नसतानाही काही जल जीवन मिशनच्या गुत्तेदाराकडून चिरीमिरी घेऊन गावात शंभर टक्के नळ जोडणी करण्यात आली आहे असे खोटे प्रमाणपत्र देण्यात आले.

अनेक ग्राम सभेचे ठराव रस्त्यावरच… 

जे पहावे ते नवलच….! ग्रामसभा ही ग्रामपंचायत कार्यालय येथे गावातील नागरिकांच्या समक्ष घेतली जाते त्यामध्ये अनेक ठराव मांडून त्यास नागरिकांकडून सहमती मिळवली जाते परंतु काही महाभाग ग्रामसेवकांनी चक्क रस्त्यावरच ग्रामसभा घेऊन प्रत्येक घरात नळ असल्याचे व्हिडिओद्वारे सांगितले आहे ते पूर्ण व्हिडिओ दैनिक सूर्योदयाच्या हाती लागले असून काही भागांनी तर ग्रामपंचायत एक आणि त्याला ठराव कृषी विभागाचे जोडलेले पहावयास मिळत आहे…..

पाणी व स्वच्छता समिती कागदावरच 

हर घर नल योजनेची पाणी व स्वच्छता समिती फक्त कागदावर घेऊन कागदपत्रे घोडे नाचवत संबंधित सरपंच व ग्रामसेवकांनी चिरीमिरी पाई हे सर्व कागदपत्रे घोडे नाचवले आहेत….

ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंत्याने केल्या एसी रूम मध्ये बसून सह्या?

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तर नवलच केले आहे त्यांनी कोऱ्या फॉर्मवर सह्या मारल्या असून कोणत्याही गावाची चौकशी केली नसून एका जागेवर बसून सर्व कामे योग्यरीत्या पार पाडले आहे असे या फॉर्मच्या माध्यमातून सह्या करून सांगितले आहे कार्यकारी अभियंता साहेब आपण खरंच गावात जाऊन सर्व कामाची योग्य चौकशी करून सह्या केल्या आहेत का याचे उत्तर अपेक्षित…..

विभागातून एकमेकांवर बोट दाखवण्याचे काम 

दैनिक सूर्योदय ने हा सर्व प्रकार संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रत्येक अधिकारी आपली जबाबदारी नसून ते काम दुसऱ्याने केले असल्याचे सांगत आहे या सर्व पुराव्यावरून असे निदर्शनास येते की यामध्ये ग्रामपंचायत पासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचाच हात असावा.

पाणीपुरवठा मंत्री यांचे कारवाई करण्याचे आदेश 

हर घर नल योजनेबाबत झालेली गैरप्रकार व भ्रष्टाचार याचे सर्व माहिती पाणीपुरवठा मंत्री यांना दिल्यानंतर त्यांनी या सर्व प्रकारावर माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे हे बघणे महत्त्वाचे आहे की या कारवाईमध्ये किती लोक सामील असून किती लोकांवर कारवाई होणार आहे

 

जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाने शासनाची केलेली फसवणूक पुराव्यासकट भाग २ लवकरच……

Leave a Comment

error: Content is protected !!