आयसीसीने जानेवारी महिन्यातील प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केली आहेत. यामध्ये भारताचा वरुण चक्रवर्ती, पाकिस्तानचा नोमान अली आणि वेस्ट इंडिजचा जोमेल वॅरिकन यांना संधी मिळाली आहे. या तिन्ही खेळाडूंनी जानेवारी २०२५ मध्ये चांगली कामगिरी केली होती. आता हा पुरस्कार कोणाला मिळणार हे येणारा काळच सांगेल. विशेष म्हणजे ज्या खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. हे तिघेही फिरकीपटू आहेत.
वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्ध भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली होती. त्याने टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्यासमोर इंग्लंडचे गोलंदाज टिकू शकले नाहीत आणि बाद झाले. त्याने जानेवारी २०२५ मध्ये चार सामन्यांत ९.४१ च्या आश्चर्यकारक सरासरीने १२ विकेट्स घेतले. राजकोटच्या मैदानावरही त्याने तीन विकेट्स घेतल्या. टी-२० मालिकेतील दमदार कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.