सूर्योदय वृत्तसेवा
अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथील शेतकरी अण्णासाहेब विक्रम गव्हाणे यांनी सन २०२४ सालातील अतिवृष्टीच्या अनुदाना पासून वंचित ठेवल्याचा आरोप करत तहसीलदार अंबड यांना निवेदन देऊन संबंधित तलाठी यांच्यावर कारवाई करून रखडलेले अनुदान वर्ग करण्याची मागणी निवेदना मार्फत केली आहे गव्हाणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पिठोरी सिरसगांव येथील गट क्र.९८ मधील माझ्या मालकीचे क्षेत्र १ हेक्टर संपूर्ण फळबाग असुन सन २०२४ चे अतिवृष्टीचे अनुदान पिठोरी सिरसगांव चे तलाठी शिवाजी ढालके यांनी संपूर्ण क्षेत्र १० वर्षाचे मोरांबी फळबाग असतांना सुध्दा हेतूपुरस्करपणे आर्थिक देवाण-घेवाण न केल्यामुळे मला शासकीय फळबाग अनुदाना पासून वंचित ठेवले.तरी संबंधित तलाठ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करुन फळबाग अनुदान मिळवून देवून मला न्याय द्यावा. अशी मागणी करत मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालयासमोर ०९ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देखील या निवेदनात करण्यात आला आहे.