जालना जिल्ह्यात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार;भ्रष्टाचार रोखण्याचे जिल्हा प्रशासनापुढे आवाहन

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

प्रधानमंत्री आवास योजनेचा मुख्य उद्देश देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आहे.या योजनेद्वारे शहरी आणि ग्रामीण भागातील बेघर कुटुंबे तसेच कच्च्या व मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित आणि मूलभूत सुविधांनी युक्त घरे पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.परंतु जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचे समोर येत आहे.

दलालांची टोळी सक्रिय

यामध्ये ग्रामीण भागातील लाभार्थी हे बांधकाम पूर्ण करून बांधकामाचे हप्ते मिळण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत असतात परंतु लाभार्थ्यांना संबंधित अधिकारी व कर्मचारी कोणत्याही प्रकारचा थारा लागून देत नाहीत. परंतु तेच लाभार्थी जर दलाला मार्फत गेले तर त्यांचे काम होते यामध्ये संबंधित अधिकारी व दलालाचे आर्थिक संबंध येतात त्यामुळे यामध्ये लाभार्थ्याची पिळवणूक होते.

खोटी कामे दाखवून बिले उचलणे

यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात कोणतेही बांधकाम न करता दुसऱ्यांचे बांधकाम दाखवून बिल उचलण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर येत आहे यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना पैसे देऊन ही बिले उचलण्यास देत असल्याचे पुरावे दैनिक सूर्योदयाच्या हाती लागले आहे.

हप्त्यांचे वाटप वेळेवर न होणे

लाभार्थ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना लाच न दिल्यास लाभार्थ्यांच्या हप्त्यांचे वाटप वेळेवर होत नसून जे लाभार्थी एजंट मार्फत पैसे देतील त्यांचेच हप्ते वेळेवर दिले जातात.

या भ्रष्टाचारात सहभागी ग्रामसेवक,ग्रामरोजगार सेवक,ऑपरेटर,गृहनिर्माण अभियंता व यांच्या वरती देखील आणखीन कोणी आहे का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.या अनियमिततांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जालना जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासनाने होणाऱ्या घोटाळ्यावर उपाययोजना करून लाभार्थ्यांची कसून तपासणी करणे, कारवाईत दोषी आढळलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे,सामाजिक लेखापरीक्षण करणे,तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई करणे.यासह अन्य बाबींचाही विचार करावा जेणेकरून खऱ्या गरजूंना याचा लाभ मिळू शकेल.जिल्हा प्रशासनातील अधिकारी या प्रकरणात काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!