सूर्योदय वृत्तसेवा|जालना
बांधकाम विभाग जिल्हा परिषद जालना कार्यालयातील अधिकाऱ्यांना बातमी च्या अनुषंगाने माहिती मागितली असता त्याचा राग मनात धरून दैनिक जालना सूर्योदयचे संपादक गणेश जाधव यांना अमोल मदनलाल बांगड यांनी धमकी दिली होती.त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलून दमदाटी केली.या घटनेचा राज्यभरातील पत्रकारांनी निषेध केला.या प्रकारानंतर बांगड यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकारांनी केली.राज्यभरातील पत्रकारांनी संताप व्यक्त केल्यानंतर बांगड यांनी आपला लेखी माफीनामा अंबड पोलीस ठाण्यात सर्व पत्रकारांसमोर व पोलीस अधिकाऱ्यांसमोर दिला आहे.मला लोकशाहीच्या चौथ्यास्तंभा विषयी आदर आहे.या सर्व प्रकरणाबाबत मी संपादक गणेश जाधव यांची व सर्व पत्रकारांची माफी मागतो,असं लेखी दिलेल्या माफीनाम्यात म्हटले आहे.भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार नाहीत,असे आश्वासनही अमोल बांगड त्यांनी दिले आहे.