दैनिक ‘सूर्योदय’च्या पाठपुराव्यामुळे सुखापुरी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना मिळाले स्वच्छ पिण्याचे पाणी…!

सूर्योदय वृत्तसेवा

विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांच्या भविष्याशी खेळणे…! हीच बाब लक्षात घेऊन,दैनिक ‘सूर्योदय’च्या टीमने अंबड तालुक्यातील सुखापुरी हायस्कूलमधील पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या दोनच दिवसांत विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.

सविस्तर माहिती अशी की गेल्या काही काळापासून सुखापुरी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.तहानलेले विद्यार्थी शाळेबाहेर पाणी पिण्यासाठी भटकत होते,ज्यामुळे त्यांचा अभ्यासाचा वेळ वाया जात होता आणि आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची भीती होती.ही गंभीर बाब दैनिक ‘सूर्योदय’च्या निदर्शनास येताच,दैनिक सूर्योदय च्या टीमने कोणतीही वेळ न घालवता तातडीने शाळेला भेट दिली.शाळेला भेट दिल्यानंतर, दैनिक ‘सूर्योदय’च्या प्रतिनिधींनी थेट मुख्याध्यापक आणि शाळेच्या अध्यक्षांना संपर्क साधला.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची चिंता व्यक्त करत, त्यांना शाळेत तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.ही केवळ मागणी नव्हती,तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी उचललेले एक ठोस पाऊल होते.दैनिक ‘सूर्योदय’ने या समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली.

दैनिक ‘सूर्योदय’च्या या जलद आणि प्रभावी हस्तक्षेपामुळे दोनच दिवसांत चमत्कार घडला..! शाळेच्या प्रशासनाने मागणीची तातडीने दखल घेतली आणि युद्धपातळीवर काम करत विद्यार्थ्यांसाठी जारच्या पाण्याची सोय केली.लवकरच शाळेत फिल्टर बसून विद्यार्थ्यांना फिल्टरचे पाणी सुरू करण्यात येईल असा शब्दही यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक यांनी दिला.आता विद्यार्थ्यांना शाळेतच स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळत आहे,ज्यामुळे त्यांना पाणी शोधण्यासाठी बाहेर जावे लागणार नाही आणि त्यांचा मौल्यवान वेळ वाचेल.या यशस्वी पाठपुराव्यामुळे सुखापुरी हायस्कूलचे विद्यार्थी,पालक आणि स्थानिक नागरिकांनी दैनिक ‘सूर्योदय’चे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

“समाजातील छोट्या वाटणाऱ्या पण मोठ्या समस्यांवर प्रकाश टाकून त्या सोडवण्यासाठी दैनिक ‘सूर्योदय’ने आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. ही केवळ पाण्याची सोय नाही,तर ‘दैनिक सूर्योदय’च्या जागरूक पत्रकारितेचा आणि सामाजिक बांधिलकीचा विजय आहे.”

Leave a Comment

error: Content is protected !!