गोंदी पोलीस आणि आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ताटातूट झालेल्या मनोरुग्णाला मिळाला कुटुंबाचा आधार

जालना;मुलं चोरुन नेणारा चोरटा म्हणून नागरिकांनी एका परप्रांतीयाला पोलिसाच्या स्वाधीन केलं होतं. परंतु, पोलिसांनी केलेल्या तपासात तो मनोरुग्ण असल्याचं समोर आलं. त्यामुळे गोंदी सदरील मनोरुग्णाच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मनोरुग्णाला नातेवाईकांच्या स्वाधीन केलं. त्यामुळे मनोरुग्णाला कुटुंबीयांचा आधार मिळाला आहे.मागील 18 महिन्यापासून ओरिसा येथून बेपत्ता असलेल्या मनोरुग्णाला गोंदी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आणि आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्राच्या वतीने आज त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलय. विशेष म्हणजे लहान मुले पळवणारा व्यक्ती या अफवेतून शाहगड येथील नागरिकांनी पकडून त्याला गोंदी पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. मात्र गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या विशेष प्रयत्नातून ही व्यक्ती अखेर त्याच्या कुटुंबीयाकडे परत गेली आहे.

दोन दिवसापूर्वी शहागड येथील लहान मुलांना पळवणारा माणूस म्हणून तेथील नागरिकांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्ती ही मनोरुग्न असून ती ओडिसा येथील असल्याच समोर आल होत. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी ओरिसा येथील पोलिसांशी संपर्क साधला. ओरिसा येथील पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून दिल्यानंतर या मनोरुग्णाला जालना येथील आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे या निवारा केंद्रात असतानाही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज दुपारी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने, स्थानिक गुन्हे शाखेचे रामप्रसाद पहुरे, सतीश श्रीवास यांनी आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र येथे धाव घेतली. त्यानंतर मनोरुग्ण असलेला मंगू बसंतीया याला त्याचे काका आणि भावाच्या स्वाधीन करण्यात आलं. यावेळी आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्राचे संचालक अरुण सरदार आणि वैशाली सरदार यांची देखील उपस्थिती होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Comment

error: Content is protected !!