सूर्योदय वृत्तसेवा|गणेश जाधव
जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांनी पंचायत समिती अंबड येथे (११ रोजी)आढावा बैठक घेतली या बैठकीस सर्व कार्यालयाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी खासदार कल्याण काळे यांनी विविध विभागाचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेतली.ही माहिती घेताना यामध्ये पुरवठा विभाग, तहसील कार्यालय कृषी कार्यालय तसेच इतर महत्त्वाच्या कामाचा आढावा घेतला.आणि ज्यावेळी पंचायत समिती विभागाचा आढावा सुरू होता त्यावेळी तेथील उपस्थित नागरिकांनी विहिरीसाठी व घरकुलासाठी अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले जातात असा थेट आरोप तेथील अधिकाऱ्यांवर खासदार काळे यांच्यासमोर केला यावरून पंचायत समितीच्या सभागृहात एकच गदारोळ झाला हा गदारोळ तब्बल अर्धा तास अधिकारी आणि नागरिकांमध्ये चालू होता.यामध्ये सविस्तर माहिती अशी की पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या सार्वजनिक सिंचन विहिरी व घरकुल यासाठी कर्मचाऱ्याकडून पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही अशी ओरड नागरिकांनी खासदार कल्याण काळे यांच्यासमोर केली त्यावरून खासदार यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत यांना चांगलेच धारेवर धरून त्यांना या भ्रष्टाचाराबाबत खडसावले यावरून पंचायत समिती व इतर विभागात चालू असलेला सावळा गोंधळ या आढावा बैठकीतून समोर आला.यावेळी बैठकीस माजी आमदार संतोष सांबरे,तहसीलदार विजय चव्हाण,नगरपरिषद मुख्याधिकारी उकिरडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत,तालुका कृषी अधिकारी गंडे व इतर सर्व यंत्रणेचे कार्यालय प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.