अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत

सूर्योदय वृत्तसेवा

अंबड एकात्मिक बाल ‍विकास सेवा योजनेतंर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस 51 पदे मानधनावर भरण्यात येणार आहेत. अर्जाचा विहीत नमुना ग्राम पंचायत व अंगणवाडी केंद्रात उपलब्ध करुन दिलेला आहे. तरी किमान बारावी उत्तीर्ण वय 18 ते 35 दरम्यान असलेल्या स्थानिक महिला अर्जदारांनी शुक्रवार दि.21 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपले अर्ज अंबड येथील पंचायत समितीच्या परिसरातील एकात्मिक बाल ‍विकास सेवा प्रकल्पात सादर करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंबड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!