गावात एक थेंब पाणी नाही पण पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायत कार्यालयाने कागदोपत्री पाजले गावकऱ्यांना शंभर टक्के पाणी

 

सूर्योदय वृत्तसेवा (भाग ३)

हर घर नल योजनेत जालना जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा व ग्रामपंचायत कार्यालयाचा सावळा गोंधळ…..

जालना जिल्हा परिषदेने हर घर नल योजनेत अनेक त्रुटी असल्यामुळे जिल्ह्यातील हर घर नल योजना कागदावरच पूर्ण करण्यात आली आहे.या योजनांसाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगणमत करून हर घर नल योजना ही जिल्ह्यात पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड केले आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभागाने एका प्रकारे शासनाची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सविस्तर माहिती अशी की आजही अनेक भागांमध्ये मुख्यत्वे करून ग्रामीण भागामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होत नाही.पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने हर घर नल योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रति व्यक्ती प्रतिदिन ५५ लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाईल.या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी नळ कनेक्शन जोडले जाईल.जेणेकरून नागरिकांना दूरवर जाऊन पाणी आणण्याची आवश्यकता नाही आणि त्यांना प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी पिता येईल.यामुळे त्यांचे आरोग्य सुधारेल व त्यांचे अर्थ जीवनमान सुधारेल हा या योजनेचा उद्देश आहे.असे असताना जालना जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ही योजना फक्त कागदोपत्रीच पूर्ण करून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या योजनेत ज्या अधिकारी कर्मचारी यांनी गैरव्यवहार करून खोटी कागदपत्र शासनास सादर केली आहे अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई होणे गरजेचे आहे.

घर घर जल गाव प्रमाणपत्र;उप अभियंता यांनी केली शासनाची फसवणूक

या प्रमाणपत्रा मधे असे लिहिण्यात आले आहे की, गावातील खालील नमुद बाबींची पूर्तता होत असल्याची पाहणी करुन आज दि…….रोजी सदर गाव ” हर घर जल” गाव म्हणजेच गावांतील १०० टक्के कुटुंबांना वैयक्तिक कार्यात्मक नळ जोडणीद्वारे जल जीवन मिशनच्या मानकाप्रमाणे पाण् पुरवठा होत असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे.

१.गावातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणी देण्यात आली आहे.

२.नळ जोडणी पाईप्स व्यवस्थित भिंतींना घट्ट बसविण्यात आले आहेत.मोकळ्र जागांवरील पाईप्स सिमेंट कॉक्रेट प्लॅट फोर्मवर बसविण्यात आले आहेत.

३.सर्व नळ जोडणीद्वारे विहीत प्रमाणात पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

४.सर्व कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पुरविण्यात येत असलेल्या पाण्याची गुणवत्र पिण्यायोग्य आहे. (BIS १०५०० नुसार)

५.गावातील वितरण वाहिनीमध्ये कुठेही पाणी गळती होत नाही.

६.गावातील पदाधिकारी जसे ग्रामपंचायत सदस्य, ग्राम पाणी व स्वच्छ समितीमधील सदस्य, देखभाल दुरुस्ती कर्मचारी वर्ग,पाणी गुणवत्ता चाचणी Fie test Kit वापरण्याकरीता प्रशिक्षित ५ सदस्य व पाणी पुरवठा विभागाशी संबंधित कर्मचारी/अधिकारी यांची नावे पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.

७.नळ जोडणी देण्यात आलेल्या सर्व कुटुंब प्रमुखांची नावे पोर्टलवर अपलो करण्यात आले आहेत.

८.पाणी पुरवठा योजना पुर्ण झाल्यानंतर खोदण्यात आलेली सर्व रस्ते दुरुस्त करण्या आली आहेत.

यासह आणखी वेगवेगळ्या बाबींची पूर्तता केली असून यावरती ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता यांची स्वाक्षरी आहे.

ग्रामपंचायत कार्यालयाचा ठराव

या ठरावांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की गावात १००% कुटुंबांना हर घर नल योजनेद्वारे पाणीपुरवठा केल्या जात आहे यामध्ये ग्रामपंचायत शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्र या सर्व शासकीय संस्थांना नळ जोडणी देण्यात आली आहे तसेच यामध्ये प्रत्येक महिन्याला गावातील पाण्याचा नमुना प्रशिक्षित व्यक्ती करत आहे. असा ठराव ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच व ग्रामसेवकांनी दिला आहे.

कार्यात्मक घरगुती नळ जोडणी सर्व कुटुंबांना प्रदान केल्याचे ग्रामसेवक व सरपंच यांचे प्रमाणपत्र

या प्रमाणपत्रांमध्ये असे लिहिले आहे की ग्रामसेवक व सरपंच प्रमाणित करतो की,गावातील १०० टक्के कुटुंबांना कार्यात्मक नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.हा प्रस्ताव आज दि…… रोजी ग्रामसभेमध्ये पारीत करण्यात येत आहे. या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक व सरपंच यांचे सही शिक्के आहेत.असे कागदोपत्री लिहिले गेले असले तरी ही योजना काही गावांमध्ये पूर्ण नसलेल्या स्वरूपात दिसून येते तरी देखील ही पूर्णत्वाचे प्रमाणपत्र नेमके कशासाठी दिले गेले हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व बाबी फक्त कागदोपत्री पूर्ण केले असल्याने या सर्व बाबींची उच्चस्तरीय चौकशी होणार का व झाल्यास ती निष्पक्षपणे होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सदरील हर घर नल योजनेत जोपर्यंत दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई अथवा निलंबन होत नाही तोपर्यंत दैनिक सूर्योदय या गैरव्यवहाराचा सतत पाठपुरावा करत राहील…

 

भाग ४ लवकरच……

Leave a Comment

error: Content is protected !!