सुर्योदय वृत्तसेवा
अंबड तालुक्यातील सुखापुरी मध्ये असलेले देशी दारूचे दुकान हटवण्यासाठी सुखापुरी येथील मागासवर्गीय वस्तीतील नागरिकांनी अंबड तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.निवेदनात नमूद आहे,की सुखापुरी मधील देशी दारूचे दुकान हे राहत्या लोकवस्तीमध्ये असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे.दारू पिण्यासाठी येणारे लोक महिलांना व ये-जा करणार्या शाळकरी मुला-मुलींना अश्लील भाषेचा वापर करून अरेरावी करतात.लगतच असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.दारूच्या दुकानावर जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्याने वस्तीमधील रहिवाशांनासुद्धा याच रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने दारू पिऊन येणार्या लोकांचा महिला व मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे रात्री महिलांना घराबाहेर पडण्याची भीती वाटत आहे.०८ एप्रिल पर्यंत दुकान हटविण्यात आले नाही,तर दारू दुकानासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.