सूर्योदय वृत्तसेवा|जालना
पोलीस ठाणे गोंदी येथे (शनिवार १७ रोजी) सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर सोबत पोलीस कॉन्स्टेबल शाकेरोद्दीन सिध्दीकी असे पेट्रोलींग करीत असताना त्यांना एक विना नंबरची मोटार सायकल मिळून आली त्या अनुषंगाने सदर मोटार सायकल बाबत अशोक गाडेकर यांच्याकडे मोटार सायकलचे कागदपत्रे नव्हते त्यात त्यांनी मोटार सायकल ही गोंदी तांडा येथील प्रभाकर गंगाराम पवार या सराईत गुन्हेगाराकडून विकत घेतल्याचे सांगीतले. त्यामुळे प्रभाकर गंगाराम पवार यास ताब्यात घेउन मोटार सायकल बाबत चौकशी करणे कामी पोलीस उप निरीक्षक किरण हावले, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक नागरगोजे,पोलीस नाईक चरणसिंग बमनावत,पोलीस कॉन्स्टेबल सिध्दीकी असे गोंदी तांडा येथे पोलीस उप निरीक्षक किरण हावले यांची खाजगी गाडी क्रमांक MH25BA2226 यामध्ये गोंदी तांडा येथे गेले होते. सदर आरोपीस गोंदी तांडा येथे चौकशी कामी सोबत येण्या बाबत सांगीतले असता प्रभाकर गंगाराम पवार त्याचे नातेवाई सुरेखा विलास शिंदे,सपना पवन शिंदे,लक्ष्मी महादेव पवार,कैलास राठोड,जया ऊर्फ रूपाली पवार व एक अनोळखी व्यक्तीने जमाव जमीवला त्यात प्रभाकर पवार याने पोलीस कॉन्स्टेबल सिध्दीकी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड मारला त्यात तो दगड हातावर लागला व सर्वांनी मिळून दगड फेकून मारहाण केली त्यात पोलीस कॉन्स्टेबल सिध्दीकी व पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे हे जखमी झाले तसेच पोलीस उप निरीक्षक किरण हावले यांची खाजगी कार क्रमांक MH25BA2226 हीची तोडफोड केली होती.त्यावरून त्यांच्यावर पोलीस स्टेशन गोंदी येथे गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्हयाच्या तपासात गुन्हयातील अटक आरोपी यांच्याकडे चौकशी करता ते गांजालागवडीचा व विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने त्यांच्या जवळील गांजा सापडूनये म्हणुन त्यांनी पोलीसांवर हल्ला केला होता अशी माहीती मिळाल्याने सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपीतांच्या घरी छापा मारला असता त्या ठिकाणी गांज्याची झाडे मिळून आली त्यात पोलीसांनी आरोपी गंगाराम सावळा पवार यास अटक केली असून पोलीसांनी एकूण १४ किलो ३ लाख ६४ हजार रुपयांचा गांजा जप्त केला त्यात आरोपी नामे गंगाराम सावळा पवार,वकिल्या ऊर्फ विलास बाबूराव शिंदे, प्रभाकर गंगाराम पवार, सुरेखा विलास शिंदे, सपना पवन शिंदे, लक्ष्मी महादेव पवार, कैलास राठोड जया ऊर्फ रूपाली प्रभाकर पवार व त्यांचे इतर नातेवाईक मिळून हे त्यांच्या राहत्या घराजवळ गांजा पिकवून त्याची त्याची जिल्हयात व परजिल्हयात विक्री करीत असल्याची माहीती मिळाली असून आरोपीतांची पोलीस कस्टडी घेउन सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी गुन्हाच्या अधिक तपास करुन पोलीस कस्टडी मधील आरोपी गंगाराम पवार यांच्या कडे सखोल तपास करुन आरोपी गांजा विक्रि करण्यासाठी वापरत असलेले एक स्कॉर्पिओ वाहण व दोन दुचाकी वाहन अंदाजे ७ लाख असा एकुण १० लाख ६४ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल आरोपी कडुन जप्त केला आहे व ईतर आरोपींचा पोलीस पथके शोध घेत आहे सदर आरोपींवर राज्यात व परराज्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन येथे चोरी,पाकीटमारीचे,घरफोडीचे व दरोड्याचे गुन्हे असून त्यांचा शोध घेणे कामी गोंदी पोलीस स्टेशन येथील 4 पथके शोध घेत आहेत.