सूर्योदय वृत्तसेवा (भाग ५)
जिल्ह्यातील ग्रामसेवक व सरपंचावर होणार का फसवणुकीचे गुन्हे दाखल?
जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हर घर नल योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याचे समोर आले आहे. जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाने काम न करताच काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अपलोड केले असून त्यामुळे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा महाघोटाळा या योजनेत झाला असल्याचे समोर येत आहे.ही बाब संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असतानाही वरिष्ठ अधिकारी,कर्मचारी एकमेकांची पाठराखण करताना दिसत आहे. सविस्तर माहिती अशी जल जीवन अंतर्गत हर घर नल या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पूर्णपणे प्रयत्न करून ही योजना राज्यातील प्रत्येक घरातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पाणी देण्यासाठी सुरू केली होती असे असताना जालना जिल्ह्यात घरघर नल योजनेचे काम फक्त कागदावरच झाले असल्याचे दिसून येते.ही योजना ग्राम स्तरावर असल्याने यामध्ये ग्रामपंचायत सहभाग असतो मात्र जिल्ह्यातील ग्रामपंचायत मधील सरपंच व ग्रामसेवक यांनी गावाचा विकास न पाहता फक्त चिरीमिरी कडे लक्ष दिल्याचे यावरून स्पष्ट होते सविस्तर माहिती अशी की गावात घरघर नल योजना पूर्ण झाली नसतानाही काही चिरीमिरी पाई ग्रामसेवक व सरपंच महोदयांनी गावात 100% नळ जोडणी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व विशेष ग्रामसभा घेऊन व्हिडिओद्वारे आमच्या गावात पूर्णपणे नळ जोडणी झाली असल्याचे प्रमाणपत्र पोर्टलवर अपलोड केले आहे (मात्र हे फक्त कागदावरच असून गावात कोणत्याच प्रकारे नळ योजना आढळून येत नाही) त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून शासन भरपाई घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे?
ग्रामसभा न घेताच ठराव पारित
गावातील प्रत्येक कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध करुन दिल्यानंतर संबंधित उप अभियंता,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद यांनी संबंधित गावाच्या ग्रामपंचायत/ग्राम पाणी व स्वच्छता समितीस या परिपत्रका सोबतच्या परिशिष्ट १ प्रमाणे” हर घर जल” प्रमाणपत्र/कार्यपूर्ती अहवाल उपलब्ध करुन द्यावे.उप अभियंता,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद यांचेकडून कार्य पूर्ती प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीने या परिपत्रका सोबतच्या परिशिष्ट-२ प्रमाणे गाव ” हर घर जल” घोषित करण्याबाबत ठराव घ्यावा.त्यानंतर ग्रामपंचायतीने / ग्राम पाणी व स्वच्छता समितीने गावाच्या ग्राम सभेमध्ये गाव ” हर घर जल” घोषित करण्याबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.ग्रामसभे दरम्यान संबंधित सरपंच / अध्यक्ष, ग्राम पाणी व स्वच्छता समिती यांनी ग्रामसभेस उद्देशून गावातील सर्व कुटुंबांना तसेच शाळा/ अंगणवाडी केंद्र/आश्रमशाळा इ.यांना स्वतंत्र नळ जोडणी द्वारे पाणी पुरवठा उपलब्ध होत आहे का? गावातील कोणतेही कुटुंब स्वतंत्र नळ जोडणी द्वारे पाणी पुरवठ्यास वंचित नाही ना?”अशी विचारणा करावी,ग्रामसभा सदस्यांनी हात उंचावून याबाबत प्रतिसाद द्यावा.याप्रसंगाचा साधारणतः २-३ मिनिटांचा चांगल्या दर्जाचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन हा व्हिडिओ उपलोड करणे आवश्यक आहे.तदनंतर सरपंच,ग्रामपंचायत/अध्यक्ष, ग्राम पाणी व स्वच्छता समिती यांनी या परिपत्रका सोबतच्या परिशिष्ट ३ प्रमाणे प्रमाणपत्र द्यावे. असे शासनाने ग्रामपंचायत यांना आदेशित केले होते परंतु असे न करता व कोणतीही ग्रामसभा न देता परस्पर रस्त्यावरती व्हिडिओ काढून खोटी ग्रामसभा घेऊन शासनाची फसवणूक केली.
गटविकास अधिकारी म्हणतात चौकशीसाठी वेळ नाही
हर घर नल योजनेची व्याप्ती एवढी मोठी आहे की ग्रामीण पाणीपुरवठा विभागा बरोबरच ग्रामपंचायत यांचा देखील समावेश आहे त्यामुळे सदरील घोटाळ्याबाबत गट विकास अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी असे उत्तर दिले की तुम्ही एका गावाचे नाव सांगा फक्त त्याची चौकशी करू परंतु पूर्ण तालुक्याची चौकशी करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही मग गट विकास अधिकारी या पूर्ण घोटाळ्याची चौकशी करणार आहे की नाही का मग गटविकास अधिकारी देखील या घोटाळ्यात सामील आहेत का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाग ६ लवकरच….