जालना जिल्ह्यातील हर घर जल योजना चोरीला; वरिष्ठ प्रशासन व आमदार खासदार या चोरी गेलेल्या योजनेचा शोध लावणार का?

सूर्योदय वृत्तसेवा

मराठीत काही वर्षांपूर्वी मकरंद अनासपुरे यांनी अभिनय केलेला ‘जाऊ तिथे खाऊ’ नावाचा एक चित्रपट आला होता.त्यात मकंरद अनासपुरे त्यांची न बांधलेली पण मंजूर झालेली विहीर चोरीला गेली अशी तक्रार दाखल करतात आणि त्यानंतर झालेली सगळी गंमत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.जालना जिल्ह्यात देखील अशाच प्रकारे एक योजना चोरीला गेल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात प्रत्येक गावात हर घर जल पोहोचले असल्याचे कागदोपत्री जिल्हा प्रशासनाने शासनास दाखवले आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात ही योजना पूर्ण झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जाऊ तिथे खाऊ या चित्रपटाप्रमाणे जालना जिल्ह्यात हर घर जल योजना चोरीला गेली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे….

सविस्तर माहिती अशी की राज्य शासनाने हर घर जल ही योजना महाराष्ट्र राज्यात राबवली होती त्यानुसार जालना जिल्ह्यातही ही योजना पूर्ण करण्यास शासनाने पाणीपुरवठा व ग्रामपंचायत प्रशासनात आदेशाद्वारे कळविले होते. मात्र पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद जालना व जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत प्रशासनाने ही योजना प्रत्यक्षात अमलात न आणता फक्त कागदोपत्री पूर्ण केली आहे. यावरून जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावाला नळाद्वारे पाणी मिळते अशी घोषणाच करून टाकली आहे. त्यामुळे या चोरीला गेलेल्या योजनेचा जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व जिल्ह्यातील आमदार खासदार शोध घेणार का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे…..

जिल्ह्यातील नागरिकांनी आपापल्या गावातील नळ योजना चोरीला गेली का सापडली हे कमेंट मध्ये नक्की कळवा…..

 

पुढील भाग लवकरच…

Leave a Comment

error: Content is protected !!