सुर्योदय वृत्तसेवा
गरिबांसाठी हक्कांचे घरे मिळावे या उदात्त हेतूने शासनाने सुरू केलेली घरकुल योजना घर भेदींमुळेच पोखरली जात आहे.यामुळेच दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टांची कागदोपत्री पूर्तता होत असली तरी अनेकांना हक्कांच्या घरांसाठी झगडावे लागत आहे. अंबड तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यासाठी चक्क पैसे मागत असल्याचे दिसून येत आहे. जे लाभार्थी पैसे देतील त्यांनाच या हप्त्याचे वाटप करण्यात येत आहे.आणि जे लाभार्थी पैसे देण्यास नकार देतील त्यांच्या कामात त्रुटी काढून त्यांचे अडवणूक करण्याचे काम संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून होताना दिसत आहे.सविस्तर माहिती अशी की अंबड तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल योजना या व इतर योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहे सदरील घरकुलाचे पैसे हे चेक द्वारे देण्यात येतात परंतु चेक खात्यावर जमा करण्यास संबंधित प्रशासनातील अधिकारी पैशाची मागणी करत असल्याचे समोर येत आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या लाभार्थ्यांची होणाऱ्या आडवणुकी कडे लक्ष देऊन पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
जुन्या बांधकामाचेही पैसे दिल्यास चेक
तालुक्यातील काही लाभार्थी व अधिकारी संगणमत करून जुने बांधकाम दाखवून त्याचे हप्ते उचलण्याचा प्रताप करत आहे.संबंधित अधिकाऱ्यांना पैसे दिल्यास जुन्या बांधकामाचेही चेकद्वारे पेमेंट काढले जात आहे.या सर्व प्रकाराकडे गटविकास अधिकारी व सीईओ लक्ष देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुढील भाग लवकरच….