३० एप्रिलपर्यंत सर्व्हे सुरू;ग्रामसेवकांसह नागरिकांना मोबाईल वरही करता येणार नोंदणी
सुर्योदय वृत्तसेवा|गणेश जाधव
पात्र गोर-गरिब नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आता नव्याने घरकूल मिळणार आहेत.प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट होण्यासाठी सद्या सव्हें सुरु असून तो दोन पध्दतीने करता येत आहे.आपले या योजनेत नाव नोंदणीसाठी गावच्या ग्रामसेवकांकडे संपर्क करावा,अथवा स्वतःच्या मोबाईल ॲपवर सेल्फ सर्व्हे करूनही नाव नोंदणी करता येईल.प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट होण्यासाठी जिल्ह्याभरात सध्या सव्हें सुरु आहेत.यामध्ये आपली नोंदणी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी किंवा आपण स्वतः सेल्फ सर्व्हे करून आपली नोंदणी करू शकता.एक ते दहा निकषांचे पालन करून कच्चे घर असणाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत आपली नोंदणी करावी,नोंदणी करण्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची तारीख असून त्या अगोदर पात्र नागरिकांनी आपली नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ग्रामसेवकांशी संपर्क साधा
पात्र नागरिकांनी सेल्फ सर्वे करावा, ज्या नागरिकांना हे शक्य नाही,अशांनी गावच्या ग्रामसेवकांशी संपर्क साधावा, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेवून पंतप्रधान आवास योजनेत आपले नाव समाविष्ट करावे.