सुर्योदय वृत्तसेवा (भाग ६)
जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व जिल्ह्यातील ग्रामपंचायत मधील सरपंच व ग्रामसेवक यांनी एक अजब कारभार केल्याचे समोर आले आहे बहुदा गावात अस्तित्वात नसलेली हर घर नल योजना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी कागदावर मात्र पूर्ण झाली असल्याचे अजब दाखलेच केंद्र शासनाला दिले आहे त्यामुळे ही अजब कल्पना या अधिकाऱ्यांना नेमकी कोणत्या वरिष्ठांनी दिली का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.सविस्तर माहिती अशी की देशातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळावे त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने हर घर नल योजनेची घोषणा केली होती त्यानुसार प्रत्येक नागरिकाला 55 लिटर पाणी देण्यात यावे असे सांगण्यात आले होते असे असताना जालना जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी व जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक यांनी नागरिकांना कागदावरच पाणी पाजले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायत प्रशासन यांचा अजब कारभार समोर आला आहे. हा प्रताप करताना अधिकारी व कर्मचारी यांनी कोणत्या बड्या नेत्याचा किंवा अधिकाऱ्याचा आदेश पाळला हे चौकशीतून पुढे येणे गरजेचे आहे.
पाणीपुरवठा व ग्रामपंचायत प्रशासन यांनी केलेला गैरप्रकार खालील प्रमाणे👇
हर घर जल’ गाव प्रमाणपत्र (पाणी पुरवठा विभागाद्वारे)
गावाचे नाव………….. ग्रामपंचायत तालुका जिल्हा……..वरील गावातील खालील नमुद दि……………. रोजी सदर गाव बाबींची पूर्तता होत असल्याची पाहणी करुन आज हर घर जल” गाव म्हणजेच गावांतील १०० टक्के कुटुंबांना वैयक्तिक कार्यात्मक नळ जोडणीद्वारे जल जीवन मिशनच्या मानकाप्रमाणे पाणी पुरवठा होत असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे.
१.गावातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणी देण्यात आली आहे.
२.नळ जोडणी पाईप्स व्यवस्थित भिंतींना घट्ट बसविण्यात आले आहेत. मोकळ्या जागांवरील पाईप्स सिमेंट कॉक्रेट प्लॅटफोर्मवर बसविण्यात आले आहेत.
३.सर्व नळ जोडणी द्वारे विहीत प्रमाणात पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
४.सर्व कुटुंबांना नळ जोडणी द्वारे पुरविण्यात येत असलेल्या पाण्याची गुणवत्ता पिण्यायोग्य आहे. (BIS १०५०० नुसार)
५.गावातील वितरण वाहिनी मध्ये कुठेही पाणी गळती होत नाही.
६.गावातील पदाधिकारी जसे ग्रामपंचायत सदस्य, ग्राम पाणी व स्वच्छता समितीमधील सदस्य,देखभाल दुरुस्ती कर्मचारी वर्ग, पाणी गुणवत्ता चाचणी Field test Kit वापरण्याकरीता प्रशिक्षित ५ सदस्य व पाणी पुरवठा विभागाशी संबंधित कर्मचारी/अधिकारी यांची नावे पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.
७.नळ जोडणी देण्यात आलेल्या सर्व कुटुंब प्रमुखांची नावे पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत,
८.पाणी पुरवठा योजना पुर्ण झाल्यानंतर खोदण्यात आलेली सर्व रस्ते दुरुस्त करण्यात आली आहेत.
९.सरपंच/ग्राम पाणी व स्वच्छता समितीच्या सदस्यांसह गावाची पाहणी आयोजित करुन ग्रामस्थांना वैयक्तिक नळ जोडणी द्वारे उपलब्ध पाणी पुरवठा व शुध्द पेयजलाचे फायदे विषद करण्यात आले.
१०.गावातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्र, आश्रमशाळा, ग्रामपंचायत इमारत, आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी नळ जोडणी देण्यात आली आहे.
११.घरातील, गावातील शासकीय संस्थांमधील सांडपाण्याचे विहीत पध्दतीने व्यवस्थापन करण्यात येत आहे/ करण्यात येणार आहे.
१२.पाऊस पाणी संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग)/भूजल पुनर्भरण संरचना कार्यान्वित करण्यात आली आहे/कार्यान्वित करण्यात येणार आहे.
या सर्व बाबीची पूर्तता करण्यात आली आहे (ती फक्त कागदावरच) हे प्रमाणपत्र उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद जालना यांच्या सहीने देण्यात आले आहे.
गाव “हर घर जल” घोषित करण्यासाठी ग्रामपंचायतीने द्यावयाच्या ठरावाचा नमुना
संदर्भ- उप अभियंता,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद यांचे कार्यपूर्ती
अहवाल / प्रमाणपत्र
विषय – गाव “हर घर जल” घोषित करणेबाबत जिल्हा……….. तालुका.ग्रामपंचायत गाव…
१.गावातील कुटुंबांची संख्या (आज दि… रोजी)
२.नळ जोडणी द्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या कुटुंबांची संख्या
३.खालील शासकीय संस्थांमधील नळ जोडणीची सद्यस्थिती (उपलब्ध आहे/नाही)
i.ग्रामपंचायत –
ii.आरोग्य केंद्र
iii.शाळा
iv.अंगणवाडी केंद्र
v.आश्रमशाळा
vi.सार्वजनिक गोठे
vii.सार्वजनिक स्नानगृह-
viii.सार्वजनिक स्वच्छता गृह
४.लोकवर्गणी व बँक खात्याची माहिती
५.पाणी गुणवत्ता चाचणी Field Test Kit द्वारे तपासण्या करीता प्रशिक्षित व्यक्तिची माहिती व्यक्तींची नावे व सध्याचा संपर्क क्रमांक)
६.योजनेची चालविणे व परिचालना करीता खालील व्यक्ती नामनिर्देशित करण्यात आल्या आहेत. (नाव, संपर्क क्रमांक)
७.योजनेत मोठा बिघाड आल्यास तांत्रिक सहाय्य उपलब्ध करुन योजना पुनःस्थापित करण्यास
८.योजनेच्या देखभाल व दुरुस्तीची आवश्कता भासल्यास खालील कुशल कर्मचारी वर्ग नामनिर्देशित करण्यात आले आहेत.
ग्राम पंचायत/ग्राम पाणी व स्वच्छता समिती ठरवते की, गावातील वैयक्तिक नळ जोडणी द्वारे पाणी पुरवठा उपलब्ध करुन दिल्या जाणा-या कुटुंबांची संख्या वरीलप्रमाणे असेल व गावातील योजनेच्या व्यवस्थापना करीता वरील प्रमाणे मनुष्यबळ असेल. ग्रामपंचायत असेही ठरविते की,
ज्या पेयजल स्रोतातून गावात पाणी पुरवठा करण्यात येतो अशा स्रोतातील (प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या बाबतीत Delivery Point) पाण्याचे नमुने किमान तीन महिन्यातून एकदा गोळा करुन पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत ते पाठविण्यात येईल
Field Test Kit द्वारे चाचणी केलेली माहिती पोर्टलवर नोंदविण्यात येईल.
सेन्सर आधारित संनियंत्रण प्रणालीसाठी सेन्सर स्थापित करण्याकरीता सहकार्य पुरविण्यात येईल व योजनेशी संबंधित साधन सामग्रीची काळजी घेण्यात येईल.
पाणीपुरवठा योजनेच्या परिचालन व देखभाल दुरुस्ती करीता रु…….. प्रतिमाह प्रमाणे पाणीपट्टी आकारण्यात येईल.या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक आणि सरपंच यांचे सही शिक्के आहे.
हर घर जल कार्यात्मक घरगुती नळ जोडणी सर्व कुटुंबांना प्रदान केल्याचे प्रमाणपत्र
मी. सरपंच/अध्यक्ष,ग्राम पाणी व स्वच्छता समिती. ग्रामपंचायत………जिल्हा ………. महाराष्ट्र राज्य आणि मी….. ग्रामसेवक प्रमाणित करतो की, गावातील १०० टक्के कुटुंबांना कार्यात्मक नळ जोडणी द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हा प्रस्ताव आज दि….रोजी ग्रामसभेमध्ये पारीत करण्यात येत आहे. यावर सरपंच व ग्रामसेवक यांचे सही शिक्के आहेत.
हे सर्व प्रमाणपत्र पाणीपुरवठा विभाग व ग्रामसेवक/सरपंच यांनी कोणतेही काम पूर्ण न करता शासनास सादर करण्यात आली आहे.त्यामुळे शासन या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून भरपाई घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जालना जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभाग व ग्राम पंचायत विभाग यांनी केलेल्या अजब कारभाराची सखोल चौकशी होईपर्यंत दैनिक सूर्योदय पाठपुरावा करतच राहणार….
भाग ७ लवकरच….