जलजीवन योजनेच्या कामातील बोगसगिरीमुळे जनसामान्यांचे हाल
सुर्योदय वृत्तसेवा
शासनाकडून गावकऱ्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरविण्यासाठी प्रत्येक गाव पातळीवर जलजीवन योजना राबविण्याचे काम करत नागरिकांच्या घरापर्यंत नळ जोडून पाणी देण्याचे उदिष्टे होती ते फक्त कागदोपत्री पूर्ण करण्यात आले मात्र स्थानिक गुत्तेदारांच्या बोगसगिरीमुळे शासनाचे कोट्यावधी खर्चुनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ येत असल्याने नागरिकांकडून खंत व्यक्त केली जात असून जलजीवन योजनेच्या कामातील बोगसगिरीमुळे जनसामान्यांचे हाल होतांना दिसून येत आहे.उन्हाचा तडाखा वाढला असून दिवसेंदिवस पाणी टंचाईचे संकट निर्माण होऊ लागल्याने हंडाभर पाण्यासाठी शिवार पालथे घालण्याची वेळ काही गावासह वाडीवस्तीवरील जनतेवर आली असल्याने टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.टँकरचे प्रस्ताव देऊन महिला उलटत आला तरी देखील प्रश्न मार्गी लागला नसल्याने प्रस्ताव नेमकं कोणत्या कारणाने रखडले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जालना जिल्ह्यात कोट्यावधी रूपये खर्च करून जलजीवन योजनेच्या माध्यमातून गावोगाव,वाडीवस्तीवर पाईपलाईन केल्या तर पूर्ण कागदी घोडे नाचवत काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र शासनाच्या पोर्टल वर अपलोड करण्यात आले.कोट्यावधी रूपये खर्च करून देखील दरवर्षी पाण्याचे भीषण संकट जनतेला सहन करावे लागते.मग कोट्यावधीचा खर्च करून देखील पाण्यासाठीची भटकंती का थांबत नाही.हा प्रश्न निर्माण होत आहे.मग हर घर जल घोषित करण्याचा नेमका अर्थ काय हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.