“जालना जिल्ह्यातील हर घर नल योजना घोटाळ्याची राज्य सरकारकडून दखल;घोटाळा करणाऱ्या आकावर लवकरच होणार कारवाई”

सूर्योदय वृत्तसेवा (भाग ४)

 

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे सचिवांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश

 

जालना ‘सूर्योदय’ने सर्वात आधी उजेडात आणलेला करोडो रुपयांचा हर घर नल घोटाळा प्रकरण जालना जिल्ह्यातील पाणीपुरवठा व इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे.

घाईगडबडीत कामे न करता फक्त कागदोपत्री कामे पूर्ण झाले असल्याचे दाखवत शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचे पुरावे दैनिक सूर्योदय च्या हाती लागलेल्या कागदपत्रावरून पुढे आले होते.त्यानंतर दैनिक सूर्योदय ने या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा करून बातम्या प्रकाशित केल्या.या बातम्याची दखल महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली होती व त्यांनी जिल्हा प्रशासनाला माहिती देण्याचे सांगितले होते.त्यानंतर संबंधित प्रशासनाने बरीच माहिती लपवली होती.तदनंतर दैनिक सूर्योदय ने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांना या झालेल्या घोटाळ्या बद्दल माहिती दिल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री यांनी पाणीपुरवठा विभागाचे सचिव यांना सदरील प्रकरणाची चौकशी करण्याची व दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार राज्य सरकारने हर घर नल या योजनेची चौकशी सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.एकूणच हर घर नल या योजनेच्या घोटाळ्यात सामील असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा पाय आणखी खोलात गेल्याचे मानले जात आहे.पाणीपुरवठा विभागा बरोबरच गावातील शंभर टक्के नळ योजना पूर्ण झाली अशी माहिती देणाऱ्या पाणीपुरवठा उप अभियंता,सरपंच व ग्रामसेवक यांच्यासह या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत.

 

भाग ५ लवकरच….

Leave a Comment

error: Content is protected !!