सूर्योदय वृत्तसेवा
अंबड तालुक्यातील सुखापुरी कदम येथील सुखापुरी हायस्कूल सुखापुरी शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्नेहसंमेलनाचा अनोखा सोहळा अत्यंत आनंदमयी कार्यक्रम सुखापुरी हायस्कूल सुखापुरी नुकताच पार पडला. या वेळी केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्या वेळचे शिक्षक आरडी लंगोटे जनार्दन वाघमारे राजेश पारडकर यांच्यासह प्रमुख पाहुणे व विद्यार्थी उपस्थित होते.मागील तीन ते चार महिन्यांपूर्वी सुखापुरी हायस्कूल येथील माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी व्हॉट्सअँप ग्रुपमधून एकमेकांशी संपर्क येत होता.अशातच सर्वांनी एकत्र येऊन कुठेतरी भेटून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा द्यावा,अशी इच्छा व्यक्त केली. त्याला सर्व मित्र-मैत्रिणींनी सकारात्मक प्रतिसाद देत एक दिवस सुखापुरी येथील शाळेत भेटण्याची योजना आखून स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला. या वेळी प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. सर्वांनी आठवणींना उजाळा देत एकमेकांचे परिवार, कामकाजाविषयी व सध्या काय सुरु आहे अशा गप्पा रंगत गेल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक तसेच प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
.