सूर्योदय वृत्तसेवा
जालना जिल्ह्यात हर घर जल योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने हर घर जल योजनेचे कोणतेही काम प्रत्यक्षात न करता फक्त कागदोपत्री पूर्ण केले आहे. ही बाब दैनिक सूर्योदयाच्या माध्यमातून उघडकीस आली होती. गेल्या महिन्याभरापासून दैनिक सूर्योदय च्या माध्यमातून सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. बदनापूर मतदार संघाचे आमदार नारायण कुचे यांनी हर घर जल योजनेत झालेल्या घोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित करून दैनिक सूर्योदय या वृत्तपत्राचे दखल घेतली आहे.
दैनिक सूर्योदय ने हर घर जल योजना घोटाळ्याच्या प्रसिद्ध केलेल्या बातम्या खालील प्रमाणे
३) https://esuryoday.com/state-government-probes-har-ghar-nal-yojana-scam-in-ja
४) https://esuryoday.com/non-existent-har-ghar-nal-scheme-completed-on-paper/
५) https://esuryoday.com/har-ghar-water-scheme-stolen-in-jalna-district/
पुढील भाग लवकरच…..