सूर्योदय वृत्तसेवा|जालना
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये शासनाने वेळोवेळी 04 जी आर काढुन बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. त्यामध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यात यादया अपलोडींगचे काम काज करणारे संबधत अधिकारी कर्मचारी यांनी मोठया प्रमाणावर बोगस (शेती नावावर नसलेले) नावे यादया मध्ये अपलोड करुन त्यांचे नावे आलेल्या शासनाचे अनुदानाची रक्कम त्यांचे कडुन परस्पर परत घेतल्या संबंधी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणात सत्यता पडताळणी साठी चौकशी समीती गठीत केली होती.
चौकशी समीतीने चौकशी करुन एकुण 240 गावामध्ये ₹24,90,77,811/- इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाला असल्या बाबत अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा रजि. क्र. 453/2025 कलम 316(4), 316(5), 318(4), 324(5), 336(3), 338, 340(2), 339, 238, 3(5) BNS सह कलम 52, 53 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक साहेब जालना यांचे आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा जालना करीत आहे. सदर गुन्हयात यापुर्वी 31 आरोपीतांना अटक करण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयातील फरार आरोपींचा शोध घेणे कामी रवाना होऊन आरोपी नामे आशिष प्रमोदकुमार पैठणकर, वय 45 वर्षे, व्यवसाय नोकरी सहाय्यक महसुल अधिकारी तहसील कार्यालय घनसावंगी, रा. तहसील कार्यालयाचे पाठीमागे परतुर ता. परतुर जि. जालना हा तब्बल पाच महीन्या पासुन वेळोवेळी मोबाईल व ठिकाणे बदलुन पोलीसांना लोकेशन मिळु नये याची पुर्ण खबरदारी घेवुन अटकपुर्व जामीन मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करुन पोलीसां पासुन लपुन वेगवेगळ्या धार्मीक ठिकानी वास्तव्य रहात होता तो आरोपी जालना येथे येत असल्याची गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणावरुन मिळुन आल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीसह एकुण 32 आरोपीतांना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेले असुन आशिष पैठणकर हा घनसावंगी तहसील कार्यालयातील सहाय्यक महसुल अधिकारी म्हणुन कार्यरत होते व त्याने मोठ्या प्रमाणात गावोगावी एजंट नेमुन बोगस नावे आनुदान यादीमध्ये अपलोड करुन कोट्यावधीचे आनुदान लाटले होते, त्यांचे कडील तपासामध्ये व चौकशी दरम्यान बरेच नावे उघड होण्याची शक्यता आहे इतर फरार आरोपीतांचा शोध सुरू आहे.