सूर्योदय वृत्तसेवा|जालना
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये शासनाने वेळोवेळी ४ जी आर काढुन बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. त्यामध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यात यादया अपलोडींगचे काम काज करणारे संबधत अधिकारी कर्मचारी यांनी मोठया प्रमाणावर बोगस (शेती नावावर नसलेले) नावे यादया मध्ये अपलोड करुन त्यांचे नावे आलेल्या शासनाचे अनुदानाची रक्कम त्यांचे कडुन परस्पर परत घेतल्या संबंधी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणात सत्यता पडताळणी साठी चौकशी समीती गठीत केली होती.चौकशी समीतीने चौकशी करुन एकुण 240 गावामध्ये ₹ 24,90,77,811/- इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाला असल्या बाबत अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा रजि. क्र. 453/2025 कलम 316(4), 316(5), 318(4), 324(5), 336(3), 338, 340(2), 339, 238, 3(5) BNS सह कलम 52, 53 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक साहेब जालना यांचे आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा जालना करीत आहे.सदर गुन्हयात यापुर्वी ३४ आरोपीतांना अटक करण्यात आलेले आहे.गुन्हयातील आरोपीना उच्च न्यायालयाने जामीन फेटाळलेली आहे. गुन्हयातील पाहीजे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी तलाठी निवास बाबुसिंग जाधव वय ३६ वर्षे रा. चौधरी नगर जालना हा जालना शहरात आल्याची माहीती मिळाल्याने आरोपीचा शोध घेऊन त्यास चौधरी नगर जालना येथुन ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीतास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट २ रे अंबड यांचे समक्ष हजर केले असता आरोपीस ४ दिवसाची पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. सदर गुन्हयात गुन्हयात आज पावेतो एकुण ३५ आरोपींना अटक करण्यात आली असुन इतर आरोपीतांचा व एजंटचा शोध सुरू आहे.